कोल्हापूर– नुकताच राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधी गटाला एकप्रकारचा धक्काच बसला आहे. काल आवाडे गटानेही सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणखीन मजबूत झाला आहे.
कोल्हापूर (kolhapur) मधील गोकुळ (Gokul) दुधसंघा कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर आमदार प्रकाशआण्णा आवाडे (MLA Prakash Awade) यांनी गोकुळमध्ये सत्ताधारी गटासोबत राहण्याचे जाहीर केले .
यावेळी माणगाव सरपंच राजू मगदूम, जवाहर साखर कारखाना संचालक अभय काश्मीरे उपस्थित होते.