गोकुळ म्हणजे राजकीय नेत्यांसाठी मलई आहे. दुधातून मलई काढली की जे उरतं ते म्हणजे इतर सभासदांसाठी! (Gokul election)
‘अस्सल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध’ अशी ही गोकुळच्या जाहिरातींमधील टॅगलाइन किती खरी आहे याची जिल्ह्यातील नेत्यांना पुरेशी जाणीव आहे. म्हणूनच अनेक मातब्बर नेते गोकुळच्या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.’
सत्तारूढ पॅनल असेल किंवा विरोधी पॅनल असेल सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार किती जणांनी केला. एकीकडे सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट विधानसभा निवडणुकीवर ताशेरे ओढत असतानाही एका जिल्हा दूध संघाची निवडणूक होते यावरूनच त्याची सुबत्ता लक्षात येते.
गोकुळमध्ये सत्तांतर होणार अशी चर्चा विरोधी कार्यकर्ते करत होते. तर सत्तारूढ गटच पुन्हा बाजी मारणार अशी त्यांचे कार्यकर्ते दावा करत होते. सत्तेवर कुणीही आलं तरी गेल्या अनेक वर्षांत सभासदांच्या स्थितीत किती फरक पडला? किंवा येत्या वर्षांत किती पडेल याची खात्री कोण देऊ शकत का? कारण विकास यापेक्षा राजकीय पोळी भाजून घेण्यातच नेत्यांना स्वारस्य आहे हे पुन्हा एकवेळ सिद्ध झालं आहे. खरोखरच सभासद, ठरावदार आणि सर्वसामान्य कार्यकर्यांच्या जीवाची काळजी असती तर कोरोनाचे सावट दूर होईपर्यंत गोकुळची निवडणूक स्थगित केली असती. पण तसे झाले नाही. निवडणुकीच्या दरम्यान काही ठरवादारांचा मृत्यू होऊनसुद्धा प्रचार धामधुमीत सुरूच राहिला. प्रचारासाठी जेव्हा कार्यकर्ते जिल्हाभर फिरतात तेव्हा त्यांच्या कुटूंबियांना किती घोर लागत असेल याचा विचार होतो का?
- साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी
- Best Indian Web Series – A New Era of Entertainment
- एमपीएससी परीक्षेतील ‘दारू’ प्रश्नावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; सोशल मीडियावर चर्चा
- महाराष्ट्रात या तारखेला पुन्हा देवेंद्रच…
- कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा वर्षाव.
कोणतीही नैतिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी न जपता मिळवलेला विजय हा विजय मानायचा का? सध्या थोड्या वेळात निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पण माझ्या नजरेतून दोन्हीही गट कधीच पूर्ण पराभूत झालेले आहेत.
जे नुकसान झालेलं आहे ते भरून नाही काढता येणार पण यापुढे तरी यातून शहाणपण घेऊन आपली संपुर्ण प्रतिष्ठा जिल्ह्यातील लोकांचे जीव वाचवणे आणि सुरक्षित ठेवणे यासाठी पणाला लावली तर काहीतरी अर्थ आहे.
–विशाल पाटील, उद्योजक कोल्हापूर
Atishy uttm pddhtine mandle ahe