गेले महिनाभर कोरोनाचा प्रकोप चालू आहे. पण जिल्ह्यातील राजकीय मंत्री आमदार खासदार नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकूळ निवडणुकीचे राजकारण करण्यात मग्न होते. गोकूळच्या निवडणुकीत पैशाची खैरात चालू होती. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. या काळात रेमडेसीविर इंजेक्शन, कोरोना लस यांची उपलब्धता, शहर व जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची सोय असणारी तात्पुरती रुग्णालय हे सारे प्रश्न न विचारलेले बरे (Kolhapur lockdown update)
आज गोकुळची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आल्यानंतर तात्काळ बैठक आयोजित करुन दिनांक 05/05/2021 पासून गेले काही दिवस जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रम बंद आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न व जीवाचा आटापिटा करणाऱ्या राजकीय नेत्यांना जनता वैतागली आहे. घराणेशाही, सत्तेची हाव, पैश्याची भूक भस्म्या रोगासारखी वाढतच चालली आहे. (Kolhapur lockdown update)
"कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले महिनाभर गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पर्यायी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सुद्धा तसेच गोकुळच्या 3650 ठराव पैकी 40 हून अधिक मतदारांना को रो ना झाला असताना देखील गोकुळ ची निवडणूक (gokul election) काल पार पडली. आणि आज दिनांक 04/05/2021 रोजी तात्काळ बैठक आयोजित करून वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्याकरिता उद्या दिनांक 05/05/2021 पासून 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करता, म्हणजे तुम्ही सामान्य जनतेला मूर्ख समजत आहात का?… 400 te 500 ठराव धारकांना ऐकत्र करून मतदानाला जाताना वाढत्या रुग्ण संख्येची साखळी दिसली नाही का तुम्हाला?.. 40 कोरोनाबाधित ठरावधारकांना PPE किट घालून मतदान करण्यास तुम्ही भाग पाडले..त्यावेळी कोरोनाचा विसर पडला होता का नेत्यांना? कोल्हापूर मध्ये 1 ही ventilator बेड उपलब्ध नसताना त्यासाठी प्रयत्न करताना तुम्ही सर्व नेते दिसला नाही आणि तुम्ही जनतेला गृहीत धरून मनमानी पद्धतीने निर्णय घेता? ज्या लोकप्रतिनिधीनी स्वताच्या सोयीनुसार लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे त्यांनी लक्षात ठेवा घोडेमैदान लांब नाही.. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे. कोल्हापूरकर खूप हुशार आहेत. त्यांना कोणाला कुठे गाठायचे चांगले माहित आहे…." (स्वप्निल प्रल्हाद बराले, विद्यार्थी आघाडी राज्य संघटक, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य)
- अमित शाह यांचा मुंबई दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार का ?
- मराठा कार्यकर्त्यांने मनोज जरांगेना कोड्यात टाकले ?
- कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |
- महाराष्ट्रात होणार तिसरी आघाडी, महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकत्र|
- सचिन खिलारीचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी |
ज्या काही निवडणूका झाल्या त्या मधील सर्व विजयी उमेदवाराचे मनपूर्वक अभिनंदन. आता मुद्द्दा हा आहे कि ज्या काळात ह्या निवडणूका झाल्या तो काळ योग्य आहे का ? राजकीय लोकांना खरंच विकास करायचा असेल तर जनतेचा बळी देऊन तो करायचा आहे का? आणि जर जनतेला खरच विकास हवा आहे तर स्वता: तसेच दुसऱ्याचा बळी देऊन तो करून घ्यायचा आहे का ? जनतेन ठरवलं असते तर ते यावर :बहिष्कार टाकू शकले असते पण उलट झाले. याला कोणाला जबादार धरावे हेच कोडं मोठं आहे. योगेश कांबळे . शिरोली दूमाला , करवीर .
ताज्या बातम्यासाठी तुमचा Email Subscribe करा
जीवापेक्षा राजकारण महत्वाच असत. जनतेच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास महत्वाचा हे आज निवडणुकीमुळे दिसून आल…उद्या संख्या वाढली तर खर्च उचलणार का ही राजकारणी.? का जबाबदारी घेणार..? प्रवीण मोरे सर, कसबा बावडा