Monday, March 20, 2023
No menu items!
Homeकोल्हापूरपालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघड झाला आहे - शौमिका महाडीक

पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघड झाला आहे – शौमिका महाडीक

पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ?

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गोकुळाची निवडणूक बळजबरीने घेतली गेली. अशातच 3 ठरावधारकांचा कोरोंनाने मृत्यू ही झाला आहेत.

आज या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं निकालाची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला लागली आहे. (Gokul Election Kolhapur)

कोल्हापूर जिल्ह्यात उद्या दुपारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शौमिका महाडीक (shoumika mahadik) यांनी ट्वीट करून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

“कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेतली असताना तेव्हा हट्ट आणि आता #गोकुळ निवडणूक (Gokul election)झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का ? #कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular