- Advertisement -
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्याच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कोल्हापूर मध्ये नवीन राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी छत्रपती मालोजीराजे उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने मराठा आरक्षण वर चर्चा झाली. 16 जून रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू छत्रपती यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांनी ही माहिती दिली. तब्बल पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे.Government is positive on Maratha reservation issue- Shrimant Shahu Chhatrapati