कोल्हापूर : कुणी सांगितलं ते कॉंगेसचे उमेदवार गादीचे वारसदार आहेत म्हणून. ते राजर्षी शाहूंच्या संपत्तीचे वारसदार असतील, पण राजर्षी शाहूंच्या विचरांचा खरा वारसदार मी असल्याचे धुळे जिल्ह्याचे महायुतीचे प्रचारप्रमुख राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महायुतीचे कोल्हापूरातील उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कदमबांडे कोल्हापूर दौ़र्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्सेस पद्माराजे यांचा ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे मी शाहू महारजांच्या विचरांचा खरा वारसदार आहे. कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज हे जनतेत मिसळतात, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना साजेस काम त्यांनी केल्याच माझ्या ऐकिवात नाही. त्यांनी शाहू महाराजांना केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित केलं आहे. पण राजर्षी शाहू महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर अवघ्या भारताचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांचे विचार महाराष्ट्रभर नेण्याचं काम मी केलं.
संविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस राक्षसी प्रवूत्तीला कायमचे गाढा -राजेश क्षीरसागर
मी कोल्हापूरात कार्यऱत होतो. जुन्या राजवाड्यातील भवानी मंडपात माझे वास्तव्य होते. 1990 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी संचालक म्हणून निवडून आलो. पुढे 2004 मध्ये धुळ्यातील आमदार अमरीश पटेल यांनी मला आमदार म्हणून निवडून आणले. तेव्हापासून मी धुळे शहराच्या, जिल्ह्याच्या राजकारणात व्यस्त झाल्यामुळे कोल्हापूरला येणं थोडं कमी झालं. पण राजर्षी शाहू महाराजांचा पणतू म्हणून त्यांचा खरा रक्तामांसाचा वारसदार मीच आहे. वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद आहे त्याबद्दल जास्त बोलणार नाही. दत्तक घेताना काय वाद झाला होता याबद्दल आपण सगळे जाणून आहात. दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल बोलणार नाही. असे त्यांनी सागितले. मी सध्या धुळे शहरात काम करतो, त्याच ठिकाणी राजकीय आणि सामाजिक काम करतो. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा आणि भाजपने सांगितले तर कोल्हापूरात सक्रिय होईन. Rajvardhan Kadambande