कोल्हापुरात आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर असा सामना हातकणंगले लोकसभेसाठी रंगला आहे.
विधानसभेनुसार मतदानाची आकडेवारी
चंदगड – 62.48
कागल – 68.27
करवीर – 69.87
कोल्हापूर दक्षिण – 60.59
कोल्हापूर उत्तर -59.41
राधानगरी 61.66
कोल्हापूर लोकसभा – 63.71%
हातकणंगले लोकसभा -62.18%
सायंकाळी ५ वाजेपर्यंत आकडेवारी नुसार कोल्हापूर लोकसभेमध्ये ६३.७१% मतदान झालं झाले आहे. तर सर्वात कमी मतदान बारामती लोकसभेत झाले आहे.