नागपूर, दि.२३ :हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग विस्तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबतचे निवेदन सादर केले व चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासीबहुल, वनव्याप्त जिल्हा असून ताडोबा सारख्या राष्ट्रीय उद्यानाला देशविदेशातुन पर्यटक भेट देण्यास येत असतात. हा जिल्हा विविध खनिजांनी समृध्द असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था विद्युतनिर्मीती, खनिज उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्यामुळे राज्याच्या या भागातील वाहनांना देखील समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकरिता सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून समृद्धी महामार्ग नागपूर ते चंद्रपूर-राजुरा पर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी व भूसंपादन करण्यासाठी अंदाजे २० कोटी रू. निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला उपलब्ध करून देण्याची विनंती श्री. मुनगंटीवार यांनी केली होती. अद्याप त्यांच्या सदर विनंतीला मान्यता मिळालेली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालुन या अहवालाला मान्यता देण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.
- कोल्हापूरच्या ‘कागल पॅटर्न’ने राज्याच्या राजकारणात खळबळ; कट्टर वैरी एकत्र, संजय मंडलिक एकाकी!
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय
- पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
- Apara Ekadashi Vrat Katha 2025: यहां पढ़ें पूरी व्रत कथा, शुभ योग और पूजा विधि
- A Historic Collapse: How Aaron Nesmith and the Pacers Stunned the New York Knicks in Game 1





