शेतकऱ्यांच्या कृषीमालास देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थासाहीत हा प्रकल्प असून शेतकऱ्यांचासाठी नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधा व तांत्रिक सहाय्य यासाठी आर्थिक सहाय्य प्रकल्पा अंतर्गत दिले जाणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी ७ वर्षाचा असून (२०२०-२१ ते २०२६-२७) याचा एकूण खर्च २१०० कोटी रुपये इतका आहे. यासाठी जागतिक बँकेचे कर्ज रु. १४७० कोटी, राज्य शासनाचे रु. ५७० कोटी आणि खाजगी उद्योग क्षेत्रातून (सीएसआर) ७० कोटी असून मिळून रु. २१०० कोटी उभारण्यात आले आहेत.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे स्वरूप
महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण उपजीविका व कृषी क्षेत्रामध्ये “स्मार्ट” उपाययोजना राबवून ग्रामीण महाराष्ट्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र ग्राम स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प व महाराष्ट्र ग्राम परिवर्तन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ” महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पाची (State of Maharashtra’s Agribusiness and Rural Transformation)” आखणी करण्यात आली. या प्रकल्पास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले असून १० कोटी ३लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे राज्य सरकारच्या कृषी विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे ध्येय
कृषी, पशुसंवर्धन, पणन विभागासह इतर विभागांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंलबजावणी केली जाणार असून या मध्ये ग्रामीण भागातील कृषी व्यवसाय यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे व त्यास बळकटी देणे. या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संघटीत असणे अत्यंत आवश्यक आहे .
आवश्यक कागदपत्रे:-
१) शेतकरी गटाची स्थापना करणे – नोदनी प्रमाणपत्र
२) 7/12 आधार कार्ड
३) 8 ए
4) बँक पासबूक झेरॉक्स
5) हमीपत्र
6) गटाचा ठराव
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )
मार्गदर्शक सूचना जा.क्र/आत्मा/स्मार्ट/345/2021 कृषि आयुक्तालय पुणे दि. 20/05/2021
अधिक माहिती कार्यालयाचा तपशील:-
शेती महामंडळ भवन, 270, भांबुर्डा , सेनापती बापट मार्ग, पुणे-411016.