महाराष्ट्राची मँचेस्टरआणि कोल्हापूरमध्ये सुतगिरणीचा उगम असलेली विधानसभा म्हणून इचलकरंजी विधानसभा (ichalkaranji assembly election) ओळखली जाते. विद्यमान आमदार हे प्रकाश आवाडे आहेत. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीमध्ये अपक्ष उभारून प्रकाश आवाडे यांनी 1,16,886 मते घेतली तर यांच्या विरोधात भाजपचे सुरेश हाळवणकर (suresh halvankar) यांना 67,076 मते पडली तर प्रकाश आवडे हे 49,810 मताधिक्यांनी निवडून आले. हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने यांना सर्वाधिक मताधिक्य हे इचलकरंजी विधानसभेतून (ichalkaranji assembly election) मिळाले होते.
2019 इचलकरंजी विधानसभेचा निकाल :
उमेदवार | पक्ष | मते | टक्केवारी |
प्रकाश आवाडे | अपक्ष | 116886 | 58.07% |
सुरेश हाळवणकर | भाजप | 67076 | 33.33% |
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु :
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सक्रिय झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीतून माजी आमदार सुरेश हाळवणकर (suresh halvankar) आणि भाजपचे सहयोगी विद्यमान आमदार प्रकाश आवाडे (prakash awade) यांच्यात जोरदार चुरस सुरु झाली आहे. प्रकाश आवाडे यांनी कमी कालावधीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगली जवळीक केली आहे. प्रकाश आवाडे (prakash awade) यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरू शकतात कारण राहुल आवाडे (rahul awade) हे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान तयारी सुरु केली होती. गेल्या काही वर्षापासून त्यांचा जनसंपर्क हा मोठ्या प्रमाणे दिसून येतो कारण इचलकरंजी मतदार संघात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. विविध विकास कामे करताना प्रत्यक्ष मतदारांची संपर्क साधत आहेत त्यामुळे त्यांचे उमेदवारीची चर्चा जास्त सुरु आहे. स्थानिक संस्था, बँका, सूतगिरण्या कारखाने यांच्यामार्फत आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवल्याने त्यांचे पारडे जड मानले जाते. मोशमी आवडे यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच शिंदे गटाचे रवींद्र माने यांची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरु झाली आहे. अजित पवार गटातून विठ्ठल चोपडे हेही उमेदवारीसाठी मागणी करत आहेत.
महाविकास आघाडीला तगडा उमेदवार मिळेल का ?
महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी चुरस सुरु झाली आहे. इचलकरंजी विधानसभा हि जागा पारांपरागत कॉंग्रेसकडे असल्याने हि जागा कॉंग्रेसला मिळावी अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने संजय कांबळे, शशांक बावचकर आणि राहुल खंजिरे यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. काँग्रेस मधून उमेदवारी मिळेल का हे पहावं लागेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातून मदन कारंडे हे विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. या अगोदर २०१४ साली त्यांनी निवडणूक लढवली आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी स्थानिक पातळीवर आपले कार्य सुरू केले आहे. उमेद्वाई नाही मिळाली तर अपक्ष म्हणून निवडणुकी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक जवळ येवून ठेपल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेवारी कोणालाही मिळाली तरी इतर घटक पक्ष आणि उमेवारामध्ये नाराजी होण्याची जास्त संभाव्यता आहे. इचलकरंजी विधानसभेचा विचार केला तर चर्चा फक्त हि सुरेश हाळवणक आणि प्रकाश आवाडे यांचीच आहे परंतु याचा फायदा महाविकास आघाडी घेवू शकते.