Tuesday, October 8, 2024

sarthi |स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवा- राहूल चिकोडे

- Advertisement -

महाज्योती संस्थे प्रमाणे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवा या मागणीचे निवेदन आज भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राहूल चिकोडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे तर्फे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्टायफंड दिला जातो. त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न आपण राबवत असलेल्या योजनांमुळे साकारले आहे.
मराठा समाज्याची लोकसंख्या खुप मोठी आहे. त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत नाही. सध्यस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे,यांनी ज्या पद्धतीने पुणे विभागास 200 ऐवजी 1000 जागा, व नाशिक विभागाकरिता 200 ऐवजी 300 जागा वाढविण्यात आल्या, त्यापद्धतीने मराठा समाजाची लोकसंख्या पाहता किमान बार्टी इतकी तरी विद्यार्थी संख्या करणे गरजेचे आहे. अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राहूल चिकोडे यांनी केलेली आहे. यामधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे.

  1. Monthly Stipend 8000 रू. वरून 10000 रू. करावा.
  2. महाज्योति प्रमाणे सारथी ने कंबाईन ( गट ब व गट क ) पंधराशे विद्यार्थ्यांची जाहिरात काढावी.
  3. आपत्कालीन निधी 10000 रू. वरुन 12000 रू. करावा
  4. महाज्योती व बार्टीप्रमाणे विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
  5. MPSC आणि UPSC प्रशिक्षण विद्यार्थी संख्या १००० करावी.
  6. प्रशिक्षण कालावधी 8 महिन्यावरून 11 महिने करण्यात यावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles