एकाच टप्प्यात 55000 शिक्षकभरतीसाठी आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

आज महाराष्ट्र राज्यात 67000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत ,ही सर्व पदे भरली पाहिजे .अर्थ विभाग ची मान्यता 80% आहे, तसा Gr व घोषणा शिक्षणमंत्री साहेबांनी केली आहे.त्यामुळे 55000 शिक्षक भरती प्रक्रिया एकाच टप्यात होणे गरजेचे आहे

तब्बल 5 वर्षानंतर सरकारने नवीन शिक्षकभरतीसाठी 2 लाख 26 हजार उमेद्दवरांची TAIT परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली.
परीक्षेस 2 महिने उलटूनही राज्यात शिक्षकभरतीला अजूनही सरकारला मुहूर्त सापडत नाही.

राज्याचे शिक्षणमंत्री मा. दिपक केसरकर साहेबांनी 30 पदांची शिक्षकभरती 15 जून पर्यन्त करू असे आश्वसन दिले होते. चातकासारखी वाट पाहणाऱ्या शिक्षकांच्या सहनशक्तीचा अंत सरकार पाहत आहे. याच धर्तीवर येणाऱ्या 17 जुलै पासून आझाद मैदानावर 55000 शिक्षकभरतीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सामान्य अभियोग्यता धारक संघर्ष समितीच्या वतीने छेडण्यात येणार आहे.

कंत्राटी शिक्षकभरती सेवानिवृत्त शिक्षकभरती करून सरकार तमाम अभियोग्यता धारकांच्या भावनांचे खच्चीकरण करत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांचा आवाज मंत्रालयात पोहचणार आहे.

आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजित पवार साहेव तसेच शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांना भेटलो. परंतु तोडगा निघाला नाही. म्हणून नाइलाजस्तव आम्ही आंदोलनाचा पवित्रा स्वीकारत आहोत.

प्रा. बालुशा माने, अध्यक्ष

आज महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करून पुन्हा सेवानिृवत्ती झालेल्या लोकांना नोकरी देत आहे,आपल्या तरुण मुलांचा विचार कोण करणार❓️
अमोल लटपटे, सहसचिव

आज देशात बिहार सारखे राज्य 1लाख 70 हजार भरती प्रक्रिया करतात ,मग महाराष्ट्रात का 55000 भरती प्रक्रिया होवू नये.

अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here