भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश

भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून उदयास आला आहे. | India has emerged as the world’s largest sugar producer and second largest exporter.

साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5 हजार लाख मेट्रिक टनांहून अधिक उसाचे उत्पादन झाले. यापैकी 35 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आली आणि 359 लाख मेट्रिक टन साखर साखर कारखान्यांनी तयार केली. 109 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त साखर निर्यातीचा विक्रम नोंदवला गेला आहे.

आधारभूत आंतरराष्ट्रीय किमती आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारतीय साखर उद्योगाचा हा पराक्रम झाला. या निर्यातीतून सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. 
-ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय 
vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com