कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे चौकशीसाठी ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले. अॅग्रो प्रकरणात इडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी विधानभवनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रोहित पवार यांना शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांचे पुस्तक भेट दिले. खासदार सुप्रिया सुळे ही त्यांच्या सोबत आहेत. सुप्रिया सुळे यांनी भारताचं संविधान हाती घेतलं होतं. रोहित पवारांसोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा होते.
आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही – रोहित पवार
रोहित पवार बोलताना आम्ही ईडीच्या (ED)अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहोत तसेच ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत असतात त्यांनी जी कागदपत्रं मागवली ती मी दिली आहेत. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहे त्यामुळे ही कारवाई झाली असेल पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले सध्या सुडाचे राजकारण चालू आहे त्यामुळे सर्व यंत्रणावर सरकारचा दबाव असल्याने माझ्यासोबत इडीची (ED) चौकशी होत आहे तर कोणी घाबरू नये. आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही असेही रोहित पवार म्हणाले.
सत्याचा विजय होणार – सुप्रिया सुळे
सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
नेमका आरोप काय
कन्नड सहकारी कारखान्याचे शिखर बँकेने लिलाव प्रक्रिया सुरु केली. बारामती अॅग्रोने कन्नड सहकारी कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार चुकीचे ठरवले होते..बारामती अॅग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक पाच कोटी रुपये जमा केले ते, बारामती एग्रोने दिल्याचा आरोप आहे.