पन्हाळा: कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस टोकाला गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा वातावरणात करंजफेण सारख्या गावातून बिनविरोध निवडणूक पार पडली. ही सकारात्मक बाब आहे. गेली ५६ वर्षे अटीतटीने निवडणूक पार पडत असताना हा नवा पायंडा शिवसेना आणि जनसुराज्य पक्षांनी इतर गावांच्यासाठी घालून दिला आहे. अखेरच्या काही मिनिटात जनसुराज्य व शिवसेना गटाने सामाजिक सलोखा राखत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अन् जनसुराज्य गटाने आपले अर्ज माघारी घेत प्रथम सरपंच पदाचा मान शिवसेना गटाच्या प्राजक्ता चंद्रकांत कांबळे या महाविद्यालयीन तरुणीस दिला. जनसुराज्य गटाकडून कोमल कांबळे व स्नेहा कांबळे यांना पुढील अडीच वर्षानंतर सरपंच पदाची संधी मिळणार आहे. करंजफेण ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुक झाल्यामुळे विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे. या निवडणुकीत ॲड. लालासो पाटील आणि विक्रम पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- मोठी बातमी | पुण्यात १० हजार लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपात्र
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; मोठी बातमी
- पुणे महापालिका निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू
- रस्ते,ड्रेनेजलाईनसह प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांचा महापालिका अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा अल्टिमेटम
- विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष