कोल्हापूर येथील चक्रेश्वरवाडी व संसद भवनात स्थापित होणाऱ्या राजदंडाचे Sengol अनोखे नाते असल्याचे आपल्याला दिसून येते. १२ व्या शतकातील सुरसुंदरीच्या हातात अशाच प्रकारचा राजदंड असल्याचे आढळून आले आहे. अगदी याचीच स्थापित होणाऱ्या राजदंडाची प्रतिकृती म्हणावी लागेल. यामुळे कोल्हापूर अन् इतिहासप्रेमी यांच्यामध्ये कुतूहल निर्माण झाले असून कोल्हापूरच्या प्राचीन प्रतिकांचे असे राष्ट्रीय पटलावर स्वीकारणे ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे कोल्हापुरात बोलले जात आहे.
प्राचीन कोल्हापूरचा वारसा आपल्या उदरात घेऊन चक्रेश्वरवाडी उभी आहे. चे गाव निसर्गसंपन्न राधानगरी तालुक्यातील मोडत असून याठिकाणी सातवाहन काळापासूनच्या कोल्हापूरच्या पाऊलखुणा मिळतात. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी संशोधनातून समोर येऊ शकतात. ही इतिहास व संस्कृतीच्या संशोधक -अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
What is Sengol : सेंगोल म्हणजे नेमकं काय?
‘सेंगोल’ हा शब्द तामिळ शब्द ‘सेम्माई’ वरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ नीतिपरायणता असा आहे. तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठातील मुख्य मठाधीपती यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं जातं. न्यायाचा रक्षक म्हणून त्यावर हाताने कोरलेला नंदी बसवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सेंगोल धारण करणार्या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे हे त्याने विसरू नये असे निर्देश असतात.
सेंगोल म्हणजे महादेवाचा आशीर्वाद अशी धारणा होती आणि त्याचं सेंगोलच्या हस्तांतरानं चोल साम्राज्यात सत्तेचं हस्तांतर व्हायचंय. हीच संकल्पना सी राजगोपालचारींनी पंडित नेहरुंना सांगितली. इतकंच नाही तर सत्तेचं हस्तांतर होत असताना यापेक्षा चांगलं प्रतिक मिळणार नाही असंही पटवून दिलं.
सी राजगोपाल यांनी सांगितलेली संकल्पना पंडित नेहरुंनाही आवडली आणि त्यांनी होकार दिला. त्यावेळी राजगोपालचारींनी एक समिती स्थापन केली. त्यामध्ये दक्षिणेतील काही महंताचा समावेश केला. राजगोपालचारींनी तामिळनाडूंच्या महंतांना आपला हेतू सांगितला. तेव्हाच्या मठाधीशांनीही राजगोपालचारींच्या विनंती होकार केला आणि 1947 साली वुम्मिदी बंगारु ज्वैलर्सकडून नव्या राजदंडाची निर्मिती केली. या राजदंडावर नंदीची मूर्तीही स्थापित केली.
हाच राजदंड पुढे दिल्लीत पोहोचला आणि त्याची विधिवत पूजा करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी हाच राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हातात दिला. अशा प्रकारे देशातल्या ब्रिटिश सत्तेचे हस्तांतर भारतीयांकडे झालं
हाच राजदंड स्वीकारल्यानंतर पंडित नेहरुंनी रात्री 12 वाजता ऐतिहासिक भाषण केलं. आता हाच राजदंड पुन्हा एकदा 75 वर्षांनी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे.