कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर मध्येही आता कोरोनाबाधित रुग्णांचे प्रणाम मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
जिल्ह्यातील लोकांना ऑक्सिजन बेड, रेमेडी शिवर इंजेक्शन, तसेच उपचारासाठी कोणत्या7264907888ही प्रकारच्या मदतीसाठी 24 तास संपर्क होण्यासाठी जिजाऊ फौंडेशनच्या धनश्री सचिन तोडकर यांनी कोविड हेल्पलाईन चालू केली आहे. यासाठी त्यांनी सोशल मेडियावर कोल्हापूर covid मदत सेवा नावाने ग्रुप बनवलेले आहेत. त्यामध्ये रोजचे किती बेड उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील दवाखान्यांची सध्य स्थितीची माहिती अपडेट केली जाते.
मागील वर्षीही अश्याच पद्धतीने महापुरातही मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या कामाच सर्वत्र कौतुक होत आहे.
देवदूत सचिन
गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये सहभागी होवून विविध मार्गाने गरजूंना मदत केली आहे. या कोरोनाच्या महामारीत कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातून जरी कोणी मदत मागितली तर त्यांना कोल्हापूर मध्ये राहण्याची, त्यांच्या जेवचीही सर्व सोय करत आहेत. दोन दिवसात 113 रुग्णांना त्यांनी वेळेवर बेड उपलब्ध करून त्यांच्या उपचारासाठी त्यांना मदत केली आहे. त्यामुळे अनेक गोर गरीब लोक म्हणतात देवासारखा धावून आलास सचिन…