कोल्हापूर IT park ला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ? | Kolhapur

- Advertisement -

महाराष्ट्रातील ग्रामीण दरडोई उत्पन्नात सर्वात संपन्न जिल्हा म्हणून कोल्हापूर ओळखले जाते. या ओळखीस येथील भौगोलिक परिस्थिती आणि राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी कारणीभूत आहेत. कोल्हापूरमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील नद्या बारा महिने वाहतात. या नद्यांवर धरणाचे जाळे उभारले आहे. त्यामुळे कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय ही भरभराटीचे प्रमुख घटक आहेत. परंतु गेल्या काही वर्षात भौतिक गरजांची वाढ होत असताना रोजगाराच्या नव्या संधीच्या शोधात कुशल कोल्हापूरकर पुणे, मुंबई, बेंगलोर आणि गोव्याची वाट धरत आहेत. कोल्हापुरात उद्योग निर्मितीसाठी पोषक वातावरण, महाराष्ट्र – गोवा – कर्नाटक या तिन्ही राजांना जोडणारा जिल्हा तसेच या ठिकाणी दळणवळणाची मुबलकता आहे. यात विमानसेवेची देखील भर पडली आहे. दुष्काळी अन् परराज्यातून मोठा लोंढा दरवर्षी येत आहे, विविध ठिकाणच्या नोकऱ्या व सेवा यांवर आपला जम बसवला आहे. परंतु येथील स्थानिक युवक मात्र घराबाहेर पडण्यास मजबूर झाले आहेत. पुणे येथील आयटी पार्क मध्ये कोल्हापूरकरांचा दबदबा दिसून येतो. त्यामुळे युवकवर्ग अशा ठिकाणी जाण्याचा ओढा वाढला आहे. कोल्हापूरमध्ये आयटीपार्क साठी पोषक वातावरण असून देखील आजवर स्थानिक राजकीय नेत्याच्या अनास्थेपोटी आयटी पार्कची निर्मिती अद्यापही झाली नाही. Kolhapur IT park

10वी नंतर पर्यायाची निवड करताना या चुका टाळा| ssc result

           कोल्हापूर मध्ये आयटीपार्क होण्यासाठी चर्चचे बिगुल २०१४ रोजी वाजले होते. त्यावेळी टेंबलाईवाडी येथे प्रस्तापित होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी २०२१ च्या फेब्रुवारी मध्ये हिंजवडीप्रमाणे आयटी पार्कची घोषणा केली. त्यावेळी आयटी पार्कसाठी हातकणंगले तालुक्यात संभापुर, कासारवाडी येथील जमीन मालक जमीन देण्यास तयार असून २५० एकर पेक्षा मोठे नियोजित शहर करण्याचा प्रयत्न असून सरकारने याकरिता परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन खा. धैर्यशील माने यांना दिले होते. या काळात याबाबत विविध बैठका आणि समित्या स्थापन करण्यात आल्या परंतु अद्याप आयटी पार्क कागदावरच आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आयटी पार्क मध्ये  करण्याची ग्वाही उदय सामंत यांनी सदनात दिली. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत उदय सामंत यांनी सविस्तर चर्चा केली होती. सध्या आयटी पार्कच्या चर्चेला पुन्हा उधाण आले असून यावेळी सत्यात उतरेल की कागदी घोडे नाचतील हे पहावे लागेल. Kolhapur IT park

टेंबलाईवाडी येथे होणाऱ्या आय टी पार्क मध्ये आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरने ऑफिस साठी दोन हजार चौरस फूट जागा देण्यात यावी . असोसिएशनच्या मेंबर्स साठी आय टी पार्क मध्ये सात रुपये चौरस फूट दराने जागा देण्यात यावी त्यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे.

प्रताप पाटील , अध्यक्ष आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर

आयटी पार्कसाठी जागा निश्चिती झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने केपीएमजी कंपनी व आयटी असोसिएशनची बैठक झाली. यावेळी जागेच्या दराबाबत चर्चा झाली. टेंबलाईवाडी येथे Integrate IT park होणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये अद्ययावत मॉल, हॉटेल्स ही असणार आहेत.

३५० हून अधिक नोंदणीकृत आयटी कंपन्या आहेत. यामध्ये ५० कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी काम करत आहेत. सध्या ८ ते १० हजार जणांना या कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. आयटी पार्क सुरू झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये 15 ते 20 हजार रोजगारनिर्मिती होईल.

कोल्हापूर आयटी पार्क होणे का गरजेचे आहे | Kolhapur IT park

कोल्हापूर चे भविष्य कोल्हापुरातील युवकांना & युवतींना रोजगारासाठी पुणे, मुंबई, बेंगलोर यासारख्या ठिकाणी जावे लागत तो प्रश्न मार्गी लागेल. परिस्थिति अभावी किंवा कौटुंबिक बाबींमुळे कौशल्यक्षम असून देखील जो युवकवर्ग रोजगारापासून वंचित आहे त्यांच्या हाताला रोजगार मिळतील.

भौगोलिकदृष्ट्या होणारे फायदे कोल्हापूर ही दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटक चे मध्य बिंदु समजले जाते.

व्यावसायिकदृष्ट्या विचार करायचं झाला तर कोल्हापूर हे मुंबई आणि बेंगलोर या दोन शहरांच्या मध्ये आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने पाहिले तर कोल्हापूर विमान तळावरून उड्डाण घेणारी स्टार एयर लाइन. स्टार एयर लाइन ही संपूर्ण देशभरात विमान सेवा दिणारी एयर लाइन आहे. पर्यायाने ज्या ज्या शहरांमध्ये आयटी पार्क आहेत त्या शहारांसोबत देखील जोडली गेलेली आहे.

वारंवार बैठका होऊन सुद्धा आयटी पार्क चा प्रश्न का मार्गी का लागत नाही?

वर्षानुवर्षे कोल्हापुरातील राजकीय नेते मंडळी जनतेला आणि पर्यायाने युवा वर्गाला आयटी पार्क होणार म्हणून गाजर दाखवत आहेत. असे अजून किती दिवस चालणार? फक्त घोषणाबाजी न करता त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे ही घोषणाबाजी करणारे नेते मंडळी एकदा म्हणतात की आयटी पार्क टेंबलाईवाडीला होणार (२०१४ च्या घोषणे नुसार) तर एकदा म्हणतात की आयटी पार्क हातकलंगणे तालुक्यातील संभापूर (२०२१च्या घोषणेनुसार) येथे होणार. वारंवार बैठका होतात मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. यामुळे युवावर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles