जाणून घ्या आंबा खाल्यामुळे होणारे आरोग्यासाठी लाभदायी, बहुगुणी फायदे

Live Janmat

 फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची ओळख आहे. उन्हाळा ऋतू जवळ आला की सर्वांना आंबा खाण्याची ओढ लागते. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे फळ म्हणजे आंबा. एखादा क्वचितच असा अपवाद असेल ज्या व्यक्तीला आंबा आवडत नसेल. रसाळ, मधाळ असे गुणधर्म असलेला हा आंबा केवळ चवीष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आंब्यामध्ये विटामीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे असतात. जी शरीरातील विविध समस्यांपासून आपली मुक्तता करतात. त्वचेपासून पोटापर्यंत सर्व समस्या दूर करतात.

-निरोगी हृदयासाठी आंबा उपयुक्त मानले जाते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीरातील रक्तवाहिन्या शांत ठेवतात. यामुळे हृदयाचा ठोके आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. मॅन्गिफेरीन नावाचा अँटीऑक्सिडंट हृदयाच्या पेशींना जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतो.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

आंबा हे बहुगुणी फळ आहे. याचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. आंब्याचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे आपण कोणत्याही आजाराचा सहज सामना करु शकतो. आंब्यामध्ये विटामीन ए, विटामीन के, विटामीन ई, विटामीन बी मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली प्रतिकारशक्ती बळकट होते.

पचनक्रिया सुधारते– आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या पचनासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळतो. बद्धकोष्ठता ग्रस्त लोकांनी आंब्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर– आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. यामुळे आंब्याचे सेवम केल्याने विटामीन सी ची कमतरता भरुन निघते. शरीरातील कोलेजेन नावाची प्रथिने तयार करण्यासाठी विटामीन सी आवश्यक असते. यामुळे केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच आपण सुरकुत्या आणि रुक्ष केसांपासून सुटका मिलू शकता.

आंब्यामध्ये विटामीन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. विटामीन ए ची कमतरता असल्यास रुक्ष डोळे, रात्री कमी दिसणे आदि समस्या उद्भवू शकतात. यातील अँटीऑक्सिडेंट ल्यूटिन आणि इतर घटक देखील डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवू शकतात. 

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com