Thursday, November 21, 2024

आधी राज्याच होऊ द्या, केंद्राच मी बघतो -छत्रपती उदयनराजे भोसले

- Advertisement -

मराठा आरक्षणावरुन आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Udayan Raje Bhosale) यांनी आज उदयनराजेंची भेट घेतली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. पाच बोटं एकसारखे नसतात. सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत. सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड आयोगाचा अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवताय?, असा सवालही त्यांनी केला.

पक्ष-बिक्ष इथे आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याने कायदा करावा. विशेष अधिवेशन बोलवा आणि कायदा करा. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडा… सभागृहात एक आणि बाहेर एक असं बोलू नका. विशेष अधिवेशन बोलवा, श्वेतपत्रिका काढा. कुणी कोणाला फूस लावली ते लोकांना कळेल. बाकीच्यांना आरक्षण मिळालं, तसं मराठ्यांना मिळायला हवं. लोकसंख्येच्या हिशेबाने देणार असेल तर कॅल्क्युलेशन करा, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी आधी राज्यानं ठोस काही करावं, केंद्राचं बघतो मी, असं सांगतानाच संभाजीराजे बोलणार नाहीत. ते जंटलमेन आहेत. मी बोलतो. कुणाला कुठं गाठायचं, काय करायचं हे मी बघतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.Let it be the state first, I see the center – Chhatrapati Udayan Raje Bhosale

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles