Friday, November 22, 2024

LokSabha Election 2024 Live Updates आत्तापर्यंत कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक मतदान; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

- Advertisement -

Lok Sabha Election: देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होत आहे. राज्यात ११ तर देशात ९३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. | LokSabha Election 2024 Live Updates

कोल्हापुरात आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये झाले आहे. 

ऊन सुरु होण्या अगोदर सकाळी नऊपर्यंत कुठं किती मतदान झालं ते विधानसभेनुसार पाहू. करवीरमध्ये 11.71 टक्के मतदानाची नोंद झाली.

LokSabha Election 2024 Live Updates

चंदगडमध्ये नऊ वाजेपर्यंत 5.60 टक्के मतदानाची नोंद झाली. कागलमध्ये 8.98 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 9.68 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये 9.6 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये लोक बाहेरगावी राहत असल्याने त्याचा परिणाम मतदानावर दिसला सकाळच्या पहिल्या दोन तासात अवघे 3.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर मतदारसंघांमध्ये मतदारांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. यासोबतच कोल्हापूरमध्ये आजपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी 70 टक्के मतदान होते. त्यामुळे त्याच टक्क्यांमध्ये मतदान होण्यासाठी महायुती महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार गेला महिनाभर झाला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा दणका चांगलाच वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होत आहे. यासाठी 12 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत.

 थेट लढत संजय मंडलिक आणि शाहू छत्रपती महाराज यांच्यामध्येच आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये काय होणार याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंलगेच्या जागेवर कमालीचं लक्ष केंद्रित केलं आहे.

पहिल्या दोन तासांतली मतदानाची टक्केवारी | राज्यात एकूण 6.64 टक्के मतदान | LokSabha Election 2024 Live Updates

1. लातूर – 7.91 %
2. सांगली – 5.81 %
3. बारामती – 5.77 %
4. हातकणंगले – 7.55 %
5. कोल्हापूर – 8.04 %
6. माढा – 4.99 %
7. धाराशिव – 5.79 %
8. रायगड – 6.84 %
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 %
10. सातारा –7.00 %
11. सोलापूर – 5.92 %  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles