- Advertisement -
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे ६००० आणि राज्याचे ६००० असे १२००० रुपये प्रतिवर्ष मिळणार
- १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार