- Advertisement -
आज भाजपा आणि शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. तसेच, राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारीत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना निधी, पीकविमा, वीज, सोयी, सुविधा याबाबत मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. जाणून घेऊया….
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना