Maharashtra Budget 2023 |श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण 50 कोटी रुपये

0 12

- Advertisement -

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद : दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह (jyotiba Mandir) 28 गावांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. अर्थ संकल्पांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे. जोतिबा मंदिरासह नजिकच्या परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास
 
– श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
– श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
– श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
– प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
– गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
– श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये
– श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.