महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ ची अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

मुंबई, दि.७ :महाराष्ट्र गट- क सेवा ( Group-C Service (Main) Examination) (मुख्य) परीक्षा-२०२१, लिपिक-टंकलेखक  (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here