Mahatransco | ऊर्जा विभागातील महापारेषण मधील सहायक अभियंता हे पद सरळसेवाद्वारे भरण्यात यावे

महापारेषण (Mahatransco) मधील सहायक अभियता GATE मार्फत घेण्याचे नियोजन केले आहे.
( Mahatransco Circular – 537 Dated-29/8/2018) तरी महापारेषण सहायक अभियंता हे पद GATE मार्फत न घेता सरळसेवेद्वारे भरण्यात यावी व दहावीला मराठी विषय असण्याऱ्या उमेदवाराना का प्राधान्य देण्यात यावी. Mahatransco | The post of Assistant Engineer in Mahatransport in the Department of Energy should be filled through Saralseva
पत्रातील ठळक मुद्दे 
  • GATE परीक्षेची जाहिरात ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये निघून फेब्रुवारी – मार्च मध्ये परीक्षा होऊन निकाल लागलेले असतात. ऊर्जा विभागातील ( mahatranco / mahagenco / mahadiscom ) जाहिरातिचे काही वेळापत्रक नसते.यामुळे ज्यांनी GATE 2021 दिली आहे तेच पात्र होतील. आधीच 4 वर्षे झालीत ऊर्जा विभागात जाहिरात नाही त्यामुळे खूप मोठा वर्ग Mahatransco AE भरती पासून वंचित राहील.
  • Mahatransco AE ची काठिण्य पातळी वाढवून सरळसेवा द्वारे परीक्षा घ्यावी यामुळे सर्व उमेदवाराना संधी मिळेल.
  • तामिळनाडू राज्याच्या ऊर्जा विभागाने दहावीला तामिळ विषय असणाऱ्या उमेदवाराना प्राधान्य दिलं आहे मग महाराष्ट्रत का नाही..?
  • मुंबई महानगपालिकामध्ये दहावीला मराठी विषय असणाऱ्यानाच भरतीसाठी पात्र केले जाते.ऊर्जा विभागाने पण मुंबई महानगरपालिकाचे अनुकरण करावे.जेणेकरून महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थानां जास्तीत जास्त संधी मिळू शकेल.
  • मागील आठवड्यात स्वप्नील लोणकर या स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थीने शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आत्महत्या केली.राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना  GATE मार्फत घेण्याचा अट्टहास का..?
  • केंद्र शासन व JEE च्या परीक्षा होत आहे तरी आपण पण Mahatransco AE ची भरती सरळसेवा द्वारे घेवुन बेरोजगार विद्यार्थीना दिलासा द्यावा.
  • 28/11/2019 रोजी Mahagenco AE ची 43 पदासाठी जाहिरात आली होती.आज जवळपास 2 वर्षे झाली तरी त्याची परीक्षा झाली नाही.याबाबत तातडीने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करा.
  • IN THE HIGH COURT JUDICATURE AT PATNA
CIVIL WRIT JURISDICTION
CASE NO – 8760 OF 2019
CASE NO – 9152 OF 2019
कलम 16 नुसार सर्वाना सरकारी नोकरीत समान संधी मिळाली पाहिजे.
तसेच पटना उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की GATE मार्फत परीक्षा घेणे हे भेदभाव ठरू शकते.
मुळातच GATE ही उच्च शिक्षण व शिष्यवृत्ती साठी असलेली चाचणी परीक्षा आहे.
– 28/11/2020 रोजी मा.नितीन राऊत यांनी 8500 पदाची घोषणा केली होती.जवळपास वर्ष झाली तरी जाहिरात आली नाही यावर तातडीने कार्यवाही करावी.
पटना उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की GATE मार्फत भरती घेणं हे उमेदवारान मध्ये भेदभाव करण्यासारखं आहे आणि कलम 16 नुसार सर्वाना नोकरीत समान संधी मिळालीच पाहिजे असे मिलिंद राठोड ( स्थापत्य अभियंता ) यांनी संगितले.
अगोदरच दोन वर्ष कोरोणा मध्ये गेली आहेत. Passout होऊन आता खूप वर्ष झाली तरी अजुन भरती नाही, आणि आता तर GATE ची सक्ती करून ऊर्जामंत्री अजुन नैराश्य वाढवत आहेत. तरी उर्ज्यामांत्र्यानी ही भरती अगोदर प्रमाणे IBPS मार्फत तात्काळ राबवावी.
विशाल पाटील ( विदुयत अभियंता)
गेली ४/५ वर्षांपासून महापारेषन मधील सहायक अभियंता या पदाच्या भरतीची वाट बघत आहोत.तरी GATE ची सक्ती रद्द करून अगोदर प्रमाणे IBPS मार्फत ही भरती लवकरात घेण्यात यावी
अमोल धांडे ( विद्युत अभियंता )

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles