तासगाव विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होण्याचे संकेत दिसत आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade) यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी साकारली जाणार आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनीही तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांच्यासोबत राहण्याची जाहीर केले आहे.
विशाल पाटलांनी (Vishal Patil) स्पष्ट केले की, “आगामी निवडणुकांमध्ये अजित घोरपडे याशिवाय पर्याय नाही.” ते मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते नंतर त्यांनी सारवासारव केली देखील. या पार्श्वभूमीवर, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले आहे.
याअर्थाने, तासगाव आणि कवठेमहांकाळ या मतदारसंघात रोहित पाटील (Rohit Patil) आणि माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही कुटुंबांची सत्ताकेंद्रे हुकण्यासाठी तिसऱ्या आघाडीने शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. हालचालींचा भाग म्हणून, खासदार विशाल पाटील (Vishal Patil) आणि अजितराव घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच सावर्डे येथे एक मेळावा आयोजित करण्यात आला आगामी काळात विशाल पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. आर. आर. पाटील व संजय पाटील कुटुंबांनी बेरोजगारांना काम दिले नाही, असा आरोप या मतदारसंघात करण्यात येत आहे.
तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर.आर.आबांनंतर सुमनताई दोन वेळेस आमदार होत्या. रोहित पाटील लहान वयापासूनच स्थानिक राजकारणामध्ये सक्रीय असलेले दिसून येतात पण त्यांना बऱ्याचदा विरोध ही झाला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांची काय भूमिका असेल हे पहावं लागेल.