Hatkanangale Lok Sabha मागील पाच वर्षातील काळात सत्ता संघर्षामध्ये राज्यात महत्त्वाचे दोन राजकीय भूकंप झाले. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी सत्तेत असताना वेगळा मार्ग स्वीकारत विरोधी पक्षात असलेल्या भाजपला साथ देत सत्ता स्थापन केली. सत्तेच्या बाहेर राहून राजकारण करता येणार नसल्याने काही दिवसातच एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी धैर्यशील माने हेही सत्तेत सामील झाले. पण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर फोडाफोडीचे राजकारण लोकाना पसंत पडलेले नाही. गेली चार वर्षात माने यांचा जनसंपर्क नसल्यामुळे लोकांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी खासदार हारवला आहे, असे डिजिटल करून लावलेले होते. त्यामुळे राजू शेट्टी यांना आव्हान देण्यासाठी आघाडीकडून नवीन चेहरा देणार की विद्यमान खासदार माने यांनाच संधी देणार हे लवकरच समजेल.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचा समाविष्ट होतो. यामध्ये शाहुवाडी,हातकणंगले,इचलकरंजी आणि शिरोळ हे कोल्हापूर मधील तर इस्लामपूर आणि शिराळा हे सांगली जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत.
कोल्हापूर जिल्हा | २७७ – शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ २७८ – हातकणंगले विधानसभा मतदारसंघ २७९ – इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ २८० – शिरोळ विधानसभा मतदारसंघ |
सांगली जिल्हा | २८३ – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ २८४ – शिराळा विधानसभा मतदारसंघ |
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघाची पहिली निवडणूक 1962 साली झाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब मल्हारराव शिर्के यांचा 99683 मतांनी पराभव केला. पुढे 1967 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षातून एम.व्ही.आर.सी. भोसले यांनी काँग्रेसमध्ये असणाऱ्या एस.पी.टी. थोरात यांचा पराभव केला. 1971 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष पुन्हा आमने सामने आले यावेळी मात्र काँग्रेसचे दत्तात्रय बाबुराव कदम यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार त्र्यंबक सिताराम कारखानिस यांचा पराभव केला. यानंतर काही कारणास्तव हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात रूपांतर झाला. 2008 पर्यंत हा मतदारसंघ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ होता.
Kolhapur LokSabha| २०२४ ची निवडणूक प्रतिष्ठेची;उमेदवारीवरून रस्सीखेच
2009 साली याचे रूपांतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झाले. 2009 च्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी काँग्रेसच्या निवेदिता माने यांचा ९५०६० मतांनी पराभव केला. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा हे दोन पक्ष आमने-सामने आले यावेळी काँग्रेसकडून कलाप्पा बाबुराव आवाडे उभे होते पुन्हा स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी १७७८१० मतांनी पराभव केला अशा प्रकारे सलग दोन वेळा राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिले. यानंतर 2019 च्या निवडणुकीमध्ये माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने हे शिवसेना पक्षाकडून उभे होते यांच्या विरोधात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी होते. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी 96039 एवढ्या फरकांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला.
लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल | Hatkanangale Lok Sabha
अ.क्र | विधानसभा | उमेदवार | पक्ष |
१ | शाहुवाडी | विनय कोरे | जनसुराज्य शक्ती |
२ | हातकणंगले | राजू आवळे | काँग्रेस |
३ | इचलकरंजी | प्रकाशअण्णा अवाडे | अपक्ष |
४ | शिरोळ | राजेंद्र पाटील (यड्रावकर) | अपक्ष |
५ | इस्लामपूर | जयंत पाटील | राष्ट्रवादी |
६ | शिराळा | मानसिंग नाईक | राष्ट्रवादी |
राजू शेट्टी यांची एकला चलो रे ची भूमिका
शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजू शेट्टी (Raju shetti) यांना महाराष्ट्रात ओळखले जाते. स्वाभिमानी संघटनेच्या (swabhimani sanghatana) माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा उभा केला आहे. नुकत्याच झालेल्या ऊस आंदोलनामुळे परत एकदा शेतकऱ्यांना शेट्टी यांचे नेतृत्व हव आहे. गेली दोन वर्षापासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. विद्यमान खासदार मतदारसंघात सक्रिय नसल्याचा फायदा शेट्टी यांनी घेतला आहे. त्यामुळे लोकांनी परत चूक करायची नाही असेच ठरवले आहे.
राजू शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडी या कोणाचाही भाग होणार नाही असे स्पष्ट केले आहे. पहिल्या खासदारकीवेळी भाजपसोबत आणि नंतरच्या खासदारकीवेळी राष्ट्रावादीसोबत गेल्यानंतर राजू शेट्टींच्या राजकारणाची दिशा बदलली. शरद पवार यांच्या सोबत गेल्याने आंदोलनात सक्रिय असतानाही त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. त्यातून योग्य तो धडा घेतल्यानंतर आता राजू शेट्टींनी कोणसोबतही न जाण्याची भूमिका घेतली आहे आहे.
जर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत गेले नाही तर महाविकास आघाडी आपला उमेदवार या लोकसभा मतदारसंघात उभा करू शकते. असे झाल्यास या Hatkanangale Lok Sabha मतदारसंघात ही लढत तिरंगी होऊ शकते व राजकारणात मोठा फेरफलट होऊ शकतो हे पाहावयास मिळणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदार कोण अशी चर्चा सुरु आहे. अद्याप अजून स्पष्ट झाले नाही कोणता उमेदवार असेल व कोणत्या पक्षाकडून लढणार आहे. राजू शेट्टी हे स्वतंत्र लढण्याचे संकेत दिसून येतात.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी अनेक मोठी नावे चर्चेत | Hatkanangale Lok Sabha
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे आहे. राजू शेट्टी आपल्या स्वाभिमानी पक्षाकडून स्वतंत्र लढताना दिसतील. या मतदारसंघाचा विचार केला तर आवाडे कुटुंबाचा राजकीय मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येतो. कलाप्पाआण्णा आवाडे हे दोन वेळा खासदार राहीले होते. तर प्रकाश आवडे यांचाही या मतदार संघात राजकीय दबदबा दिसून येतो. सध्या कॉँग्रेस मधून बाहेर पडून त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. जिल्ह्यातील महत्वाचे राजकीय निर्णय घेताना आवडे यांची भूमिका महत्वाची ठरते. भाजपच्या अनेक मोठे नेत्यांचा संपर्क वाढल्याने कदाचित आवडे यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसून येतात. तसेच प्रतीक पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. तर वंचित कडूनही उमेदवार देण्याची शक्यता आहे.