कोल्हापुरात मोठे फेरबदल ; भाजपाची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर…

- Advertisement -

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना बराच वेग आलेला दिसतो आहे. राज्याच्या राजकीय घडामोडिंचा विचार करता भाजपा मध्ये मोठमोठ्या नेत्यांचा प्रवेश येणाऱ्या काळात होईल असे वक्तव्य कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडीक यांनी केले होते. त्याचबरोबर भाजपाने कोल्हापूर मध्ये तरुण पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.

भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर जिल्ह्याचे नवीन अध्यक्ष नियुक्त केले आहेत. या निवडप्रक्रियेमध्ये तरुण नेतृत्वाला मोठी संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव, कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहुल देसाई व हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा संकल्प केला आहे.

एकाच टप्प्यात 55000 शिक्षकभरतीसाठी आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

राज्यात भाजपाची जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया अनेक कारणामुळे रखडली होती. पक्ष कार्यकर्त्यांत चर्चा सुरू असताना नवीन अध्यक्ष निवडी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. यामध्ये कोल्हापुरात तरुणांना संधी मिळाली आहे. कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी राहुल चिकोडे यांच्या जागी सरचिटणीस विजय जाधव यांची निवड झाली आहे. १९९८ पासून भाजपामध्ये काम करत असताना युवा मोर्चामध्ये अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करू, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

कोल्हापूर ग्रामीणसाठी यापूर्वी समरजितसिंह घाटगे हे एकच अध्यक्ष होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून लोकसभा मतदारसंघ निहाय दोन अध्यक्ष करण्यात आले आहेत. कोल्हापूर लोकसभासाठी राहुल देसाई यांना संधी देण्यात आली आहे. राहुल देसाई हे काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र आहेत. राहुल देसाई यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते व त्यांची पत्नी रेश्मा हे दोघे जिल्हा परिषद सदस्य होते. पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचाही त्यांना अनुभव आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजवर्धन नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे ते सुपुत्र आहेत. जिल्हा परिषद सदस्य तसेच शिरोळ तालुका भाजपा अध्यक्ष असा संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी ग्रामीण भागामध्ये भाजपाचा अधिकाधिक विस्तार त्याचबरोबर लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles