Thursday, June 8, 2023
No menu items!
Homeशिक्षणपुणे महापालिकेच्या परीक्षेतील गैरप्रकार; परीक्षार्थीला रंगेहात अटक

पुणे महापालिकेच्या परीक्षेतील गैरप्रकार; परीक्षार्थीला रंगेहात अटक

पुणे : पुणे महापालिकेतील ज्युनिअर क्लार्क टायपिस्टच्या परीक्षेत (Pune Municipal Corporation clerk exam) मोबाईलचा वापर करुन कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार एनडीए मधील इंडियन इंन्स्टुमेंट फॉर एरोनॉटीकल इंजिनिअरींग अँड आयटी शास्त्री कॅम्पसमध्ये बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. पोलीस निरीक्षक शबनम शेख याचा अधिक तपास करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या ज्युनिअर क्लार्क, टायपिस्टपदाची बुधवारी लेखी परीक्षा होती. यातील एनडीएमधील केंद्रावर पवन मारक हा परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करुन त्याद्वारे बाहेर असलेला मित्र अनिल भारती यांला संगणकावरील फोटो पाठवत होता. अनिल भारती हा त्याची उत्तरे पवन याला पाठवून कॉपी करत असताना त्याला पकडण्यात आले. (Pune Municipal Corporation clerk exam) त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदसंख्येत वाढ करावी- समन्वयक समितीची मागणी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular