मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्र मध्ये खूप चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा आरक्षण या मुद्द्यामुळे बऱ्याच राजकीय पक्षांना तोटा सहन करावा लागला होता. मुख्यत: याची झळ मराठवाडा या भागांमध्ये असलेली दिसून येते. मराठा योद्धा म्हणून ओळख असलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून हा प्रश्न महाराष्ट्रभर पोहचवला यामुळे अनेक छोट्या-मोठ्या संघटना मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जोडल्या गेल्या.
या सर्व काळात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काही वेळा बदललेली दिसून आली. यामुळेच त्यांचे जवळचे अनेक स्वकीय त्यांना सोडूनही गेलेले दिसून येतात 2008 पासून मनोज जरांगे यांच्या सोबत असलेले सोलापूर मधील त्यांचे सहकार्यांनी एका माध्यमाशी बोलताना पुढील प्रश्न उपस्थित केला त्यांच्या मते मनोज जरांगे हे त्यांचे आराध्य दैवत आहेत पण सध्या येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये आम्ही राजकीय पाठिंबा महायुती की महाविकासआघाडी यामध्ये नेमका कोणाला द्यायचा हे त्यांनी सांगायला हवं लोकसभेमध्ये त्यांच्या सांगण्यावरून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता पण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देतो असं कुठेही सांगितलं नाही त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभेला आम्ही त्यांना पाठिंबा का द्यायचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जर का महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे लिहून दिलं पाहिजे की सत्तेत आल्यास मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देईन हे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मनोजदादा जरांगेनी स्पष्ट कराव जर महाविकास आघाडी हे लिहून देणार नसेल तर आपली भूमिका ठरवता येईल जेणेकरून समाजामध्ये राजकीय अस्वस्थता राहणार नाही ती दूर होईल.
महायुतीने जे आरक्षण दिलं होतं त्या ऐवजी ओ.बी.सी. मध्ये मराठ्यांचा समावेश करून आरक्षण द्याव या मागणीसाठी आपण महायुतीला पाठिंबा दिला नाही तर लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता पण महाविकास आघाडी अशी ठोस भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळे आपण आपला मार्ग निश्चित स्वीकारायला हवा अशी माझी मनोजदादांना विनंती आहे तुम्ही म्हणाल तस आम्ही काम करू.
एकंदरीत सोलापूर असो मराठवाडा असो की महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आगामी येऊ घातलेल्या विधानसभेबाबतचे मत द्विधा दिसून येत आहे.