11 तारखेला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्यासाठी #postponeMPSC ही हॅशटॅग मोहीम विद्यार्थ्यांनी चालू केली आहे.
गेल्या दोन दिवसात एमपीएससी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोणामुळे मृत्यू झालेला आहे. सध्या पुणे, औरंगाबाद, नाशिक, नांदेड सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करत आहेत. प्रत्येक लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्दी ताप खोकला असणारे विद्यार्थी आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे असूनही भीतीमुळे ते दवाखानण्यात जाण्यास तयार नाहीत. कारण त्यांनी ठरवलं आहे की परीक्षा झाल्याबर दवाखान्यात जायचं. पण त्यांना अजूनही हे माहिती नाही की त्यांच्यामुळे इतरांना ही त्रास होईल.
६० टक्के विद्यार्थी म्हणत आहेत की परीक्षा पुढे गेली पाहिजे.
आज दुपारी विद्यार्थ्यानी तेलेग्राम वर परीक्षेसंदर्भात वोटिंग घेतले आहे. त्यामध्ये एकूण ११०११ विद्यार्थ्यानी वोट केल आहे. त्यातील ६० टक्के विद्यार्थी म्हणत आहेत की परीक्षा पुढे गेली पाहिजे.
तरुणांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर विळखा. त्यांना संसर्गापासून वाचविणे आवश्यक. त्यामुळे २५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती. ब्रेक दि चेनच्या माध्यमातून उचलेल्या पावलांचीही दिली माहिती.
सविस्तर माहितीसाठी –
https://mahasamvad.in/?p=35778
हा सर्व धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आता परीक्षा पुढे घ्या अशी मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे. सकाळपासून विद्यार्थ्यांनी #postponeMPSC ट्विटर वॉर ही चालू केला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधी ना कॉल करून परीक्षा पुढे घ्या अशी मागणी केली आहे.
14 मार्च ला होणारी राज्यसेवा पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती, म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केलीत. शेवटी सरकारला नवीन तारिख जाहीर करायला भाग पडले. हा अनुभव लक्षात घेता राज्य सरकार येत्या रविवारी होणार्या संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये हस्तक्षेप करणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकार आयोगाशी बोलून योग्य तोडगा काढेल अशी आशा विद्यार्थ्यांमध्ये आहे.
नवीन बातम्यांच्या update साठी subscribe करा