सध्या पुण्यामध्ये एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. MPSC विद्यार्थी 5 पैकी 3 positive सापडत आहेत…
अन्यथा खेड्यापाड्यात कोरोनाचा उद्रेक होईल
पुण्यामध्ये मोठया प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरून विद्यार्थी येत असतात. 11 तारखेला संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. परंतु पुण्यामध्ये कठोर निर्बंध लावल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
काहिठिकाणी अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, नाशिक, नांदेड, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे बरेच विद्यार्थी आहेत. पुण्या मध्ये राहून mpsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेचे सेंटर पुणे व आसपासच्या परिसरात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही पुण्यातच राहून तयारी करत आहेत. यातच वैभव शितोळे आणि प्रतीक कांबळे या mpsc च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला .या मुळे भीतीचं खूप मोठं वातावरण निर्माण झाले आहे.अनेक अभ्यासिकेतील विद्यार्थी आजारी असतानाही मेडिकलच्या गोळ्यांवर दिवस काढत आहेत….!! जर परीक्षा घेतलीच तर खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परीक्षा 5/6 दिवसांवर आहे म्हणून सगळ्या विषयांना दहा बारा वेळा revision देऊन झाल्या…राज्यसेवेच्या पेपर्स ची काठिण्य पातळी वाढली आहे त्याप्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर ही आव्हानात्मक असणार अशी शक्यता गृहीत धरून यावेळी किमान 20 revision द्यायच्या हे टार्गेट ठेवून अभ्यास जोरात चालू होता पण अचानक माझ्या रूम मधले माझे काही सहकारी आजारी पडले त्यातल्या दोघांनी जवळच्या हॉस्पिटल ऍडमिट होऊन उपचार घेतले परंतु त्यांना फरक पडेना म्हणून त्यातले चौघे जण गावी गेले.
प्रशांत चव्हाण, एमपीएससी विद्यार्थी.
काल अचानक माझा रूम मेट पवन याची तब्बेत बिघडली म्हणून त्याला नायडू हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो त्यांनी आम्हाला पुणे मनपाच्या बाबुराव सणस मैदान येथील swab testing center वर testing साठी पाठवले…!!
आम्ही त्या ठिकाणी गेलो तर परस्थिती भयानक होती कारण पुणेकर नागरिकांपेक्षा त्या ठिकाणी mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
एवढंच नाही तर त्या ठिकाणी माझ्या ओळखीचे सात आठ मित्र भेटले यातील चार जणांची राज्यसेवा मेन्स आहे तर तीन जण combine देत आहेत. कुतूहल म्हणून एका कर्मचाऱ्याला विचारले तर ते ऐकून मला धक्काच बसला कारण त्यांच्या मते mpsc विद्यार्थी 5 पैकी 3 positive सापडत आहेत…!
भयानक आहे हे सगळं..!
मित्रांनो काळजी घ्या..!
घाबरू नका.वेळीच उपचार घ्या.
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सोशल मीडियावर परीक्षा पुढे ढकला म्हणून सरकारला विनंती करू लागले आहेत.
रामेश्वर जगताप
गेली २ वर्षा पासून MPSC ची तयारी करीत आहे, मागील कोरोना काळात स्वतः ची काळजी अभ्यास केला पण मला मागील २० दिवसा पासुन कोरोना चा ञास होत होता अत्ता कुठे मी बरा झालो आणि लगेच पेपर देण्याची मानसिकता तर नाहीच आणि माझ्यासारखे इतर विद्यार्थी आहेत, आणि आत्ता असेही खूप मिञ कळले कि त्यांना कोरोना चा ञास जाणवतो परंतु पेपर मुळे ते अंगावर काढत आहेत ़ तरी माझी विनंती की का दिवस पेपर समोर घ्यावेत.
जवळपास 50,000 cases काल होत्या. शासन आता कशाची वाट बघत आहे ?? आताच कठोर पाऊले उचलायला हवीत. Mpsc pre postponed करायला विद्यार्थांचा विरोध होता. पण त्या तारखेला म्हणजे 11 मार्च ला जवळपास 8- 10 हजार cases च होत्या फक्त पण त्या परिस्थिती ची तुलना आता करणे योग्य नाही. आज 5 पट म्हणजेच 50 हजार cases निघाल्या…. हाच वाढीचा दर राहिला तर पुढल्या 8 दिवस मध्ये daily 3-4 हजार ची वाढ पकडली तरी 70-75000 हजार पर्यंत आकडे जातील जे की खूप भयानक आहे. त्यामुळे बाकी सर्व सोडून शासनाने आरोग्यला पहिले प्राधान्य द्यावे. आणि combine ची परीक्षा एक दीड महिना पुढे ढकलावी.
सुमित कोराने, एमपीएससी विद्यार्थी
ताज्या update साठी Email Subscribe करा.