Friday, March 29, 2024
No menu items!
Homeमहाराष्ट्रmpsc andolan । हजारो विद्यार्थी सकाळपासून रस्त्यावर

mpsc andolan । हजारो विद्यार्थी सकाळपासून रस्त्यावर

- Advertisement -

नव्या अभ्यासक्रमाला विरोध करत पुण्यात MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. जोपर्यंत आयोग नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची मागणी पूर्ण करुन नोटीफिकेशन काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. mpsc andolan

या आधी आयोगाने रात्री दोन-तीन वाजता परीक्षेच्या बदलाबाबत नोटीफिकेशन टाकले आहे. त्यामुळे आमच्या मागणीसंदर्भातील कोणत्याही निर्णयाचं जोपर्यंत उत्तर येत नाही  तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवणार आहोत, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री आयोगाला यासंदर्भातील निर्णय द्यायला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरुन हालणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. mpsc andolan

mpsc exam | स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आज राज्यव्यापी आंदोलन

अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू -स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा

नवा अभ्यासक्रम 2025 पासून सुरु करावा यासाठी शिफारस आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तीन महिन्यांवर परीक्षा आली आहे. त्यामुळे अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमसीक्यूचा अभ्यास करायचा कि थेअरी पेपरचा अभ्यास करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. mpsc andolan 

आज राज्यभर MPSC Mains हा नव्या पॅटर्नबाबत २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी विविध ठिकाणी कॉंग्रेस तर्फे आंदोलन चालू आहे. नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. 

आयोगाने बदललेल्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी चार ते पाच वर्षापासून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार करत आहेत. नव्या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. या नव्या बदलाला आत्मसात करून त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही. बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे तीन-चार वर्षापासून बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. असे काँग्रेस चे नेते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली.

…तोपर्यंत आंदोलन चालू राहील

सकाळपासून शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

- Advertisement -
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular