Friday, March 24, 2023
No menu items!
Homeपुणेपुणे येथे आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयच्या बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा...

पुणे येथे आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयच्या बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न

आज पुणे येथे जिल्हाधिकारी यांना MPSC समन्वय समिती तर्फे निवेदन देण्यात आले व कार्यालया बाहेर  MPSC समन्वय समिती तर्फे निदर्शने करण्यात आली. त्यात समितीचे महेश घरबुडे व शर्मिला येवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गनिमी काव्याने जाऊन निदर्शने केली व पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सरकार mpsc विद्यार्थ्यांन वर अन्याय करत आहे, जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहील. असेही त्यांनी सांगितले आहे.

आज आम्ही सरकार च्या विध्यार्थी विरोध भूमिकेमुळे. महाराष्ट्र सरकार ज्याप्रमाणे विध्यार्थ्यांची फसवणूक करत आहे त्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. खूप विध्यार्थी आत्महत्या करत आहेत. आत्ता तरी सरकार ने विध्यार्थी हिताचा  निर्णय घ्यावा. नाही तर येणाऱ्या काळातील आंदोलन खूप आक्रमक असेल. याची  सरकारने नोंद घ्यावी

महेश घरबुडे, एमपीएससी समन्वय समिती
आमचा मित्र स्वप्नील लोणकर यांने दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली ही गोष्ट कुठेतरी मनाला चिंतेत टाकणारी आहे.गेला दोन वर्षापासून नोकर भरती असेल अन्य काही मागण्या असतील यात वारंवार दिरंगाई होत आहे 2019 सली 413 विद्यार्थी हे पूर्व आणि मुख्य परीक्षा पात्र झाले परंतु त्यांना मुलाखतीसाठी पत्र मिळाले नाही या कारणाने स्वप्निल सारख्या मित्राने आत्महत्येचा मार्ग निवडला ही परिस्थिती फक्त स्वप्नील तीच नव्हे नसून अशा अनेक विद्यार्थ्यांची मानसिकता झालेली आहे कारण मुळातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येणारे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील कामगार वर्गातून कष्ट करू वर्गातून आलेले मुले असतात.त्याचा  महिनाभराचा खर्च भागवण्यासाठी आई-वडील असतील किंवा संबंधित लोक असतील हे त्यांना रिन काढून शिकवत असतात अशातच जर पास होऊन सुद्धा दोन वर्ष मुलाखती होत नसतील तर ती परिस्थिती मानसिक त्रासाने चिंताग्रस्त होते गेल्या दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या भूमिका असतील त्यांच्या विनंती असतील या जाणून घेत त्याचा योग्य तो न्याय निवडा केला आहे ते त्या त्या वेळेला धरून योग्य होतं म्हणून आज आणि उद्या अधिवेशन चालू आहे त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या चर्चासत्रांमध्ये नोकर भरती चा आणि प्रलंबित स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांचा विचार करुन योग्य तो मार्ग महाविकास आघाडी सरकारने काढावा ही आमची मागणी सरकारकडे आहे आणि निश्चित सरकार योग्य ती भूमिका घेईल अशी आम्हाला शाश्वती वाटते.
कु.शर्मिला सुभाष येवले 
विद्यार्थिनी, पुणे 

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular