Mpsc Protest गेल्या काही वर्षांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपासून MPSC बद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. काही दिवसांपूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. आता आज संपूर्ण राज्यभरातील MPSC चे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
mpsc andolan । हजारो विद्यार्थी सकाळपासून रस्त्यावर
येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे 2023 मध्ये MPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
…तोपर्यंत आंदोलन चालू राहील
सकाळपासून शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
यावर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि कधीतरी UPSC लेव्हलचा अभ्यासक्रम लागू करावाच लागेल. हा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र ही मागणी मान्य केली तर 2025 मधील विद्यार्थी 2027 मध्ये लागू करा अशी मागणी करतील. त्यामुळे या संदर्भात योग्य विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.