mpsc protest | या विद्यार्थ्याने घेतला आमरण उपोषणाचा निर्णय…

 MPSC Mains नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. सरकारच्या नाकर्तेपणामुळे एमपीएससी उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळआली आहे. मागणी मान्य होईपर्यंत मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया बळीराम डोळे यांनी ट्वीट करून दिली आहे.

mpsc pune | पुण्यामध्ये mpsc विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन;

MPSC मुख्य परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित 

1. कोणतीही परीक्षा पद्धत ठरवत असताना त्याद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा विचार व्हावा. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75 टक्के भरती वर्ग दोन पदांसाठी घेतली जातेय.

2. तसेच उपजिल्हाधिकारी पोलिस उप-अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही पदं वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही उपजिल्हाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक पदांची भरती एमपीएससीकडून दरवर्षी होत नाही. 

3. सद्यस्थितीत अभ्यासक्रम ठरवताना तो UPSC चा काॉपीपेस्ट केला आहे. तसेच काही शंका असल्यास इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम अंतिम समजला जाईल असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. मराठी माध्यमात उपलब्ध साहित्य, मराठी आणि इंग्रजी लिहण्याच्या वेगातील फरक या सगळ्या गोष्टी पहाता इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना नैसर्गिक फायदा होणार असल्याचं चित्र आहे. 

4. वैकल्पिक विषयामध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विषयामध्ये मार्कचा फरक पडू शकतो. देशातील इतर राज्यसेवांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सोडल्यास इतर राज्यात वैकल्पिक विषय दिसून येत नाही.  mpsc exam

5. अभ्यासक्रम ठरवताना महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संस्कृती या विषयांचा विशेषत: विचार करण्यात आला नाही. तेलंगाणा, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात राज्यसंदर्भात मुख्य परीक्षेला वेगळे पेपर आहेत. 

6. सध्याच्या पॅटर्ननुसार क्लासेसची तशी गरज नाही. सध्या बरेच विद्यार्थी गावी, घरी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करत आहेत. परंतु नवीन पॅटर्ननुसार क्लास लावणे अपरिहार्य होणार आहे. नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फी सध्या दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. यामुळे ग्रामीण, गरीब विद्यार्थी आपोआप यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

7. मुलाखतीमध्ये जास्त मार्क्सचा फरक पडू नये म्हणून जवळपास इतर राज्यामध्ये 50 -100 मार्क्सची मुलाखत घेण्यात येते. आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 आणले आहे. असे असताना MPSC ची 275 मार्क्सची मुलाखत घेणं कितपत योग्य ठरेल. 

आज पुन्हा ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी बालगंधर्व चौकात आंदोलनास सुरवात झाली आगे. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समजते.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com