“आत्महत्या नाही ही सरकारने केलेली हत्याच,” एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर आरोप

Live Janmat

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. परत एकदा सर्व विद्यार्थी एकत्र येऊन सरकारला जाब विचारू लागले आहेत. ( Mpsc exam)

https://twitter.com/sikimads/status/1411569258652307457?s=19

आज mpsc च्या विद्यार्थ्यानी mpsc च्या तारखा जाहीर कराव्यात म्हणून ट्विटर मोहीम चालू ठेवली आहे. सरकार अस्तित्वात आल्यापासून एमपीएससी द्वारे शासकीय नोकरी मिळविणे स्पर्धा परीक्षार्थींना दिवास्वप्नच बनून राहिले आहे. मागील दोन वर्षांपासून आपल्या सरकारने फक्त एकच राज्यसेवेची परीक्षा घेतली आहे.  करोना, मराठा आरक्षण, तर कधी शासकीय खर्चात कपात असे कारण देऊन विविध शासन आदेश काढत सगळ्या भरती प्रक्रिया मंद करून टाकल्या आहेत. महापरीक्षा पोर्टल बंद करून आपण परत त्याच प्रकारच्या भ्रष्ट आयटी कंपन्यांना गट-क आणि गट-ड च्या परीक्षा देऊन विद्यार्थांचा भ्रमनिरास केला आहे. करोना मूळे आधीच हवालदिल असलेला विद्यार्थी आपल्या या सर्व निर्णयामुळे हा नैराश्यात गेला आहे, यामुळेच महाराष्ट्रात कितीतरी स्पर्धा  परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या आहेत.

https://twitter.com/visha_11_/status/1411549477152825349?s=19

प्रमुख मागण्या

  1. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.
  2. एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
  3. विविध परीक्षेत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या देण्यात  येऊन प्रलंबित मुलाखती घेण्यात याव्या.
  4. सरळसेवा परीक्षा खासगी आयटी कंपन्या मार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घेण्यात यावी.
https://twitter.com/swaruprahane88/status/1411551422391275527?s=19
https://twitter.com/Teju_1232/status/1411551640851685382?s=19

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here