MPSC Students Protest। MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन

- Advertisement -

MPSC Students Protest आत्तापर्यतच्या MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन सध्या पुण्यात चालू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल केल्यानंतर ती तात्काळ लागू करण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू केलं आहे. पुण्यासह राज्यभरात हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. कोंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्ताखाली हे आंदोलन चालू आहे.

mpsc protest pune । विद्यार्थ्यांची मागणी योग्यच -रोहित पवार

Mpsc Protest । विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

…तोपर्यंत आंदोलन चालू राहील

सकाळपासून शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

यावर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि कधीतरी UPSC लेव्हलचा अभ्यासक्रम लागू करावाच लागेल. हा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र ही मागणी मान्य केली तर 2025 मधील विद्यार्थी 2027 मध्ये लागू करा अशी मागणी करतील. त्यामुळे या संदर्भात योग्य विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. 

MPSC मुख्य परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित 

1. कोणतीही परीक्षा पद्धत ठरवत असताना त्याद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा विचार व्हावा. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75 टक्के भरती वर्ग दोन पदांसाठी घेतली जातेय. MPSC Students Protest

2. तसेच उपजिल्हाधिकारी पोलिस उप-अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही पदं वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही उपजिल्हाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक पदांची भरती एमपीएससीकडून दरवर्षी होत नाही.

3. सद्यस्थितीत अभ्यासक्रम ठरवताना तो UPSC चा काॉपीपेस्ट केला आहे. तसेच काही शंका असल्यास इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम अंतिम समजला जाईल असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. मराठी माध्यमात उपलब्ध साहित्य, मराठी आणि इंग्रजी लिहण्याच्या वेगातील फरक या सगळ्या गोष्टी पहाता इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना नैसर्गिक फायदा होणार असल्याचं चित्र आहे. 

4. वैकल्पिक विषयामध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विषयामध्ये मार्कचा फरक पडू शकतो. देशातील इतर राज्यसेवांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सोडल्यास इतर राज्यात वैकल्पिक विषय दिसून येत नाही.  mpsc exam

5. अभ्यासक्रम ठरवताना महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संस्कृती या विषयांचा विशेषत: विचार करण्यात आला नाही. तेलंगाणा, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात राज्यसंदर्भात मुख्य परीक्षेला वेगळे पेपर आहेत. 

6. सध्याच्या पॅटर्ननुसार क्लासेसची तशी गरज नाही. सध्या बरेच विद्यार्थी गावी, घरी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करत आहेत. परंतु नवीन पॅटर्ननुसार क्लास लावणे अपरिहार्य होणार आहे. नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फी सध्या दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. यामुळे ग्रामीण, गरीब विद्यार्थी आपोआप यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

7. मुलाखतीमध्ये जास्त मार्क्सचा फरक पडू नये म्हणून जवळपास इतर राज्यामध्ये 50 -100 मार्क्सची मुलाखत घेण्यात येते. आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 आणले आहे. असे असताना MPSC ची 275 मार्क्सची मुलाखत घेणं कितपत योग्य ठरेल. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles