कंत्राटी भरती, स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी, सरळसेवेतील परीक्षा शुल्क, पेपरफुटी कायदा आणि MPSC मधील अनेक मागण्यांसाठी आज सर्व विद्यार्थांनी मिळून उपोषण आयोजित केलं आहे. आमदार रोहित दादा पवार, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि इतर अनेक व्यक्ती संघटना मिळून उपोषणाला बसले आहेत. mpsc uposhan
आ. रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षाचे पेपरफूटी, परीक्षा फी यावरून सरकारला घेरले आहे. सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहेत. याचदरम्यान, रोहित पवार यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये रोहित पवार बोलत आहेत की परीक्षा फीच्या (शुल्क) विषयात सरकार काही ऐकत नाही, त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल. यावरून सोशल मीडियावर रोहित पवार यांच्यावर टीका सुरू आहे. या टीकेला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.mpsc uposhan
रोहित पवार ट्रॉल
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी एक ट्वीट केलं होत. की “भाजपाची ट्रोल गँग माझ्याविरोधात अचानक सक्रीय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे. एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जात आहे, ज्यात मी म्हणत आहे की, परीक्षा फीच्या विषयात सरकार काही ऐकत नाही त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल. त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही. सरकारने गाभीर्याने सांगावं यात काय चुकीचं आहे?
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. यासाठी पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. mpsc uposhan