पुण्यामध्ये कोणाचा हाहाकार माजला आहे. बेड उपलब्ध नाहीत रक्ताचा पुरवठा संपत आलेला आहे. हजारो विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षण आहेत.
14 मार्च ला होणारी राज्यसेवा पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती, म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केलीत. शेवटी सरकारला नवीन तारिख जाहीर करायला भाग पडले. हा अनुभव लक्षात घेता राज्य सरकार येत्या रविवारी होणार्या संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये हस्तक्षेप करणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कदाचित यामुळेच विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जात आहे का सवाल विद्यार्थी उपस्थित करता आहेत ?
सरकारची विद्यार्थ्यांच्या विरोधी भूमिका ?
परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असायला हवं. वाढत्या कोरोनामुळे मुलांच्या मनात भीती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणं आहेत परंतु रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पेपर देता येणार नाही म्हणून ही मुलं चाचणी करत नाहीत. हेच विद्यार्थी परिक्षेला गेले तर संसर्ग वाढेल. त्यात शासनाने शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला जाणार कसे? असाही प्रश्न आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आणि निर्बंधामुळे पेपर पुढे ढकलायला हवा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
कोरोनामुळे यांनी परीक्षा रद्द केल्या
मध्यप्रदेश , बिहार सरकारने त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ , सावित्री बाई फुले विद्यापीठ , यांनी एक महिना पुढे सर्व कामकाज ढकलले आहे, तर काल Goa Lighthouse चे एक्साम ही पुढे ढकलली आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे LDC & UDC च्या परीक्षा ही पुढे ढकलल्या आहेत. १०वी आणि १२वी चे पेपर ऑनलाइन घेता येतील का याचाही विचार चालू आहे. ९वी आणि ११वी यांचेही परिक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्षात ढकलण्यात आले आहे. मग फक्त एमपीएससी ची परीक्षा का घेत आहे सरकार?
अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
एकाच खोलीत अनेक विद्यार्थी राहत असल्याने एकाला कोरोनाची लागणी झाली तर त्याचा संसर्ग इतर मुलांना होत आहे. त्यातच परीक्षा देता यावी यासाठी विद्यार्थी लक्षणं दिसत असताना चाचणी न करता काही औषधं घेऊन अभ्यास करत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे.
हे वाचलंत का?
- PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही
- “How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”
- Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF
- कोल्हापुरातील आयटी पार्क साठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी -आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी
- DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले