Chief Minister Vyoshree Yojana: महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत वयोमानानुसार येणारे दिव्यांगत्व आणि अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गारगोटी, कोल्हापूर येथे केला.
या योजनेचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “कोल्हापूरमधून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू होईल. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत (Chief Minister Vyoshree Yojana) पात्र लाभार्थ्यांना ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य उपकरणे खरेदी करण्याची संधी मिळेल. याशिवाय, मनस्वास्थ्य केंद्रे आणि योगउपचार केंद्रांच्या माध्यमातून त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
- आधार कार्ड
- वयोमानाचा पुरावा: जन्मतारखा, वय प्रमाणपत्र किंवा इतर संबंधित कागदपत्रे.
- जात प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा (उदा. विद्युत बिल, पाण्याचे बिल, बँक स्टेटमेंट).
- बँक खाते माहिती लाभार्थ्याचे बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड, ज्याद्वारे अनुदान वर्ग केले जाईल.
- दिव्यांगत्वाचा पुरावा: जर लाभार्थी दिव्यांग असेल, तर संबंधित प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- कागदपत्रांसह, लाभार्थ्यांना स्थानिक समाज कल्याण कार्यालयात किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावा लागेल.
राज्यात आजपर्यंत १७ लाख २३ हजार ३० अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक उपकरणे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आणि उत्साह मिळेणार आहे तसेच त्यांच्या जीवनातील आवशक्य सहाय्य वस्तू सहजपणे उपलब्ध होणार आहेत.