आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास ८२ वर्षाचे सपाचे संरक्षक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव(Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. मुलायमसिंग गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर होते. गेल्या रविवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये तसेच उत्तरप्रदेशाबरोबर भारतभर शोककळा पसरली आहे.
कुस्तीपट्टू- शिक्षक ते राजकारण असा प्रवास
राजकीय पटलावर उदय होण्यापूर्वी ते एक उत्तम कुस्तीपट्टू आणि शिक्षक होते. त्यांतर त्यांनी तीनदा उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री पद भूषिविले. तसेच ते केंद्रात संरक्षण मंत्री देखील होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले. २२ ऑगस्ट पासून त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. १ ऑक्टोबरच्या रात्रीपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मेदांता येथील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते.
मुलायमसिंह यादव(Mulayam Singh Yadav) यांचे पार्थिव दिल्लीहून लखनौला आणण्याची तयारी सुरू आहे. तेथून पार्थिव इटावा येथे नेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत. उद्या दुपारी ३ वाजता मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमानात सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मेदांता रुग्णालयात भेट घेऊन दर्शन घेणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली.
“मुलायम सिंह यादवजी एक विलक्षण व्यक्तिमत्त्वाने संपन्न होते. लोकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील असलेले एक नम्र आणि पृथ्वीवरील नेते म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांनी चिकाटीने लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा केली.लोकनायक जेपी आणि डॉ. लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली.
आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी ते एक प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप व्यावहारिक होते आणि राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला. जेव्हा आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. तेव्हा मुलायमसिंह यादव यांच्याशी माझे अनेक संवाद झाले. जवळीक चालू राहिली आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो. त्याच्या मृत्यूने मला वेदना होतात. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्या संवेदना. शांतता.” या ट्विटसोबतच त्यांनी मुलायम सिंह यांच्यासोबतची अनेक छायाचित्रेही ट्विट केली.
उत्तरप्रदेशसारख्या भारतातील प्रमुख राज्याचा राजकारणात बराच काळ ते केंद्रस्थानी होते. देशातील राजकारणात ठसा उमटवणारे अभ्यासू नेते(Mulayam Singh Yadav) म्हणून त्यांची नेहमी नोंद घेतली जाईल. देशातील विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.