अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील

मुंबई, दि. २१ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील (Narendra Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मार्च २०२२ मध्ये महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली होती. महामंडळातील नियमांच्या तरतुदीनुसार अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here