राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच -अजित पवार | dcm ajit Pawar

- Advertisement -

रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबतीला घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीवर दावा केला. आता शरद पवार यांच्याकडूनही त्या नेत्यांवर कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट आला आहे. Maharashtra Political Crisis राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठी घडामोड घडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. dcm ajit Pawar

विरोधी पक्षनेता निवडण्याचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. अपात्रतेची नोटीस देणं हे बेकायदेशीर आहे. आता महायुतीचं सरकार असून ते चांगलं काम करेल. विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही रविवारीच अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास सुरू आहे त्याला सहकार्य करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना अपात्र करा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केल्याचं अजित पवारांनी दिली आहे. dcm ajit Pawar

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles