कोरोनामध्ये ड्यूटी करणाऱ्या MBBS डॉक्टरांना सरकारी नोकरीत प्राधान्य| NEET-PG

NEET-PG परीक्षा ४ महिने पुढे ढकलली; मेडिकलच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी करोना रुग्णांवर उपचार करणार

Live Janmat

“शंभर दिवस कोव्हिडसाठीची (covid) ड्यूटी पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना आगामी सरकारी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल.” असे पीटीआय या वृत्तसंस्थेने पीएमओच्या हवाल्याने सांगितलं, Covid-19 | NEET PG Exam

कोरोना (corona) आरोग्य संकटात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने अनुभवी डॉक्टर कोव्हिड सेंटर्स आणि हॉस्पिटल्समध्ये सक्षमपणे ड्यूटी करू शकतील असाही विश्वास व्यक्त करण्यात येतोय.

आत्ता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही निवासी डॉक्टर्स म्हणून काम करु शकणार आहेत. त्याचबरोबर बीएससी किंवा जीएनएम हे शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील करोना काळात वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमण्यात येणार आहे. ड्युटीचे कमीतकमी १०० दिवस पूर्ण केल्यानंतर करोना(corona) काळात काम केलेले हे वैद्यकीय कर्मचारी शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्यांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here