महाराष्ट्रात या तारखेला पुन्हा देवेंद्रच…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly election 2024) आठवडा उलटला तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाही.त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्रिपदावरुन आणि आता गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला होईल.

सहा महिन्यांपासून या निवडणुकीची चर्चा सुरु होती निवडणुकीचे निकालात चुरस निर्माण होईल अशे सर्वांचे मत होते पण निकाल हा एकतर्फी लागून महायुती पुन्हा सत्तेत आलेली दिसते. महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते आणि आज अखेर देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी माहिती आहे सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील आझाद मैदान किंवा वानखेडे स्टेडियम याठिकाणी  महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळाहोणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते तसेच NDA मधील सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर येत्या २ दिवसात भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडेल.  त्या अगोदर येत्या २ किंवा ३ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी भाजप आमदारांची बैठकही पार पडेल. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आमदारांशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला.

भाजपचे राज्यातील सर्व पदाधिकारी स्तानिक नेते आणि सर्व आमदार या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com