१ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता ही लस घ्यायची कुठे, त्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे असे अनेकांना प्रश्न पडले आहेत.
लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या सर्वांना ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे.
तुम्ही, कोविन वेबसाईट (www.cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू अँपवर आपल्या नावाची नोंदणी आणि लसीकरणासाठी वेळ निश्चित करू शकता.
तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशनचा म्हणजेच नोंदणी केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करण्याचा पर्याय अगोदर प्रमाणेच खुला असणार आहे.
हे वाचलात का ?
- ‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती
- लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! ८ मार्च रोजी डबल पेमेंट –तुमचे नाव त्वरित तपासा!
- India Clinches Champions Trophy Final Spot with a Thrilling 4-Wicket Victory Over Australia
- Anveshi Jain | Top Five Web Series Must Watch Online
असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
- आरोग्य सेतू मोबाईल अॅपवर कोविन डॅशबोर्ड दिसेल किंवा www.cowin.gov.in इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन / रजिस्टरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर रजिस्ट्रेशनचा दुसरा टप्पा सुरू होईल
- यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या फोटो आयडी कार्डपैंकी एकाची निवड करावी लागेल.
- तसंच नाव, जन्मतारीख, लिंग यासारखी माहिती भरावी लागेल
- यानंतर समोर दिसणाऱ्या पेजवर एकाच मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने तुम्हाला जास्तीत जास्त चार लाभार्थींची नावं जोडता येतील.
- त्यानंतर तुमच्या ठिकाणाचा पिन कोड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची एक यादी दिसेल. यापैंकी एका केंद्राची निवड तुम्हाला करावी लागेल
- त्यानंतर तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे लसीकरणासाठी तारीख आणि वेळ निवडू शकाल
तुमचा ईमेल id Subscribe करा
राज्य सरकारकडून १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे सरकारी केंद्रांवर तुम्हाला मोफत लस मिळू शकेल. मात्र, तुम्ही खासगी लसीकरण केंद्राची निवड केली तर तुम्हाला लसीचे पैसे द्यावे लागणार आहेत.