कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालय यांच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून “रक्ताची नाती जपुया” या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मागील वर्षी विक्रमी 555 बाटल्यांचे संकलन केले होते. याचा गरजू रक्तग्राही यांना उपयोग झाला. या उदांत समर्पण भावनेतून यावर्षीही महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भालचंद्र चिकोडे ग्रंथालयआयोजित “पुस्तकांवर बोलू काही”चे पहिले सत्र संपन्न
सध्या सातत्याने रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे रक्तदान करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या संकल्पनेतून ३ डिसेंबरला कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, बाबा जरगनगर कोल्हापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्ताची नाती जपुया. असे आवाहन राहुल चिकोडे यांनी केले आहे. या भव्य रक्तदान शिबिरास युवा पिढीने उत्फुर्त सहभाग नोंदवून सामाजिक दायित्व जपावे.