पुणे मुंबईसारखे शहर कोरोना(Corona) मुक्त होत आहेत, पण गेली काही महिने मध्ये कोल्हापूरचा मृत्यू दर जास्त आहे, आणि रुग्ण संख्याही वाढत आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पण मराठा आरक्षण( Maratha reservation) रद्द झाल्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात यावे यासाठी गेले काही दिवस मराठा क्रांती मोर्चा सातत्याने सरकारला जाब विचारत आहे.
निवड झालेले विद्यार्थी हतबल झाले आहेत. काही दिवसापूर्वी जॉइनिंग मिळत नाही म्हणून एका उमेदवाराने आत्महत्याही केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा कोल्हापुर च्या वतीने उद्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राजेश टोपे यांना शाहूनगरीत येण्याच्या अगोदर मराठा उमेदवारांना नियुक्ती द्या अन्यथा शाहू नगरीमध्ये येऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे.
राज्य सरकारने मनात आणलं तर एका दिवसात नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्या देऊ शकत पण हे महाविकास आघाडी सरकार जातीच राजकारण करत आहे. त्यामुळे लोकांच्यात फूट पाडण्याचं काम होत आहे. सरकारला विनंती आहे की त्यांनी त्वरित नियुक्या द्याव्यात, जेणेकरून सर्वांनाच दिलासा मिळेल पण राज्य सरकार जाणून बुजून मराठा विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहे. त्यामुळे आता आम्ही शांत बसणार नाही. सचिन तोडकर ( मराठा क्रांती मोर्चा, कोल्हापूर)
[…] अन्यथा उद्या उपमुख्यमंत्र्याचा ताफा … […]